तुकुम प्रभागात ज्येष्ठ नागरिकांच्या कोविड लसिकरण नोंदणीसाठी मोफत सुविधा केंद्र.

Bhairav Diwase
नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम.
Bhairav Diwase.    March 10, 2021
चंद्रपूर:- चंद्रपुर शहरातील तुकुम प्रभाग क्रमांक 1 येथे नगरसेवक तथा भाजपा चंद्रपुर महानगर महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेसाठी कोविड लसिकरणाकरिता मोफत नोंदणी केंद्र मातोश्री विद्यालय समोर 8 मार्च पासून  तुकुम येथे सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत तीन दिवसात 198 लोकांनी नोंदणी केली असून नोंदणी केंद्रात प्रभागातील ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय 65 वर्षाच्या वर आहे तसेच 45 वर्षाच्या वर असलेल्या गंभीर आजार असलेल्या नागरिकांची कोविड लसिकरणासाठी नोंदणी करुण देण्यात येत आहे.
या सुविधा केंद्राला भारतीय जनता पार्टी चंद्रपुर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी भेट देऊन महामंत्री तथा नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्या कार्याची प्रसंशा केली.यावेळी भारतीय जनता पार्टी चंद्रपुर महानगर महामंत्री ब्रिजभूषन पाझारे,झोन सभापती राहुल घोटकर, प्रज्ञाताई बोरगमवार,विजय चिताडे,वसंतराव धंधरे,उपाध्यक्षा मायाताई मांदाडे,वंदनाताई संतोषवार,महिला मोर्चा उपाध्यक्षा मंजुश्रीताई कासनगोट्टूवार, आदित्य शिगाड़े,धर्माजी खंगार, विजय ठाकरे, इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिति होती सदर कोविड लसिकरण नोंदणी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशीष बोंडे,आकाश मस्के,दत्ता पुरोहित,सचिन हरने, साहिल गोरघाते, संजय कोत्तावार,रत्न दातारकर,जितेंद्र वाकड़े यांनी अथक परिश्रम घेतले.