Top News

२५ लाखाच्या लाॅटरीचे आमिष दाखवून १० हजार लुबाडले.




(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- तुम्हाला २५ लाखाची लाॅटरी लागली असून १० हजार रुपये आमच्या खात्यावर जमा करावे लागेल अशी भुलथाप देऊन येथील एका युवकास लुबाडल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
  
       याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील बंगाली कॅम्प निवासी युवक रमजान रशिद शेख याला एका अज्ञात इसमाने व्हिडिओ पाठवला. त्या व्हिडिओमध्ये तुम्हास केबीसी व्हाॅटस् अप क्रमांकावर २५ लाखाची लाॅटरी लागली आहे. त्यासाठी तुम्ही आमच्या क्रमांकावर फोन करुन आम्ही सांगतो त्या खाता क्रमांकावर १० हजार रुपये जमा करा. १० हजार जमा होताच २० मिनिटांनी तुमच्या खात्यावर ही रक्कम ट्रान्सफर होईल व त्याची पावती पाठवली जाईल. त्यामुळे तुमचे रजिस्ट्रेशन होईल व शासनाकडून तुमचा धनादेश पास होईल असेही त्या व्हिडिओद्वारे सांगण्यात आले.

व्हिडिओ.....

ऑडिओ.....
       
       तसेच सदर व्हिडिओमध्ये एक धनादेश आणि फाईल दाखविण्यात आली आहे. त्या धनादेशावर बॅंकेच्या अधिका-याचा शिक्का आणि स्वाक्षरी दाखविण्यात आली आहे. विशेष म्हणजे तुमचा विश्वास बसावा याकरीता धनादेश आणि फाईल तुम्हाला पाठवित असल्याचे सदर व्हिडिओमध्ये म्हटले असून ज्यांना या लाॅटरीचा लाभ मिळाला आहे, त्या त्यांचेसुद्धा व्हिडिओ पाठवित असल्याचे म्हटले आहे. तसेच असे तीन व्हिडिओसुद्धा रमजानच्या व्हाॅटस् अप वर पाठविण्यात आले. ते व्हिडिओ पाहून रमजानचा विश्वास बसला व त्याने १० हजार रुपये त्या भामट्याने सांगितलेल्या खात्यात जमा करुन टाकले. २० मिनिटे झाले तरी ना त्याच्या खात्यात पैसे  ट्रान्सफर झाले ना पावती मिळाली. त्यामुळे रमजानने लगेच त्या भामट्याला फोन केला.मात्र तिकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक  झाल्याचे लक्षात येताच त्याने भद्रावती पोलिस ठाणे गाठले. परंतू तेथे त्याला आम्ही काही करु शकत नाही असे उत्तर मिळाले. त्यामुळे अशी घटना कोणाच्याही सोबत घडू नये असे त्याने सदर प्रतिनिधीला सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने