Click Here...👇👇👇

वरोरा शहरात आई-मुलाचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
वरोरा:- शहरातील यात्रा वार्ड परिसरात राहणाऱ्या आई व मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 50 वर्षीय अंकुश जगदीश खोब्रागडे व 80 वर्षीय द्रौपताबाई जगदीश खोब्रागडे असे मृतकांचे नाव आहे. खोब्रागडे यांचं यात्रा वार्ड परिसरात स्वतःचे घर आहे, मोठा मुलगा काही कामानिमित्त मुंबई येथे गेल्याने जगदीश व आई द्रौपताबाई यांच्यासाठी जेवणाची सोय जवळील मेस येथे मोठ्या मुलाने करून दिली होती. अंकुश हा जन्मजात पोलिओ ग्रस्त होता. त्यामुळे जगदीशची आई डबा घ्यायला जात असे मात्र काही दिवसांपासून द्रौपताबाई ह्या दुर्धर आजाराने ग्रस्त होत्या. 3 दिवसापासून द्रौपताबाई डबा घेण्यासाठी खानावळीत गेल्या नसल्याने काहींनी त्यांची चौकशी केली असता घरी दुर्गंधी येत आल्याने नागरिकांनी आत प्रवेश केला असता दोघे आई व मुलगा मृत अवस्थेत होते. त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता.

पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील चाचणीसाठी मृतदेह वरोरा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे, दोघांचा मृत्यू उपासमारीने झाला असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. चौकशी अहवाल नंतर त्यांचा मृत्यू हा उपासमार झाला कि कोरोनाने हे स्पष्ट होणार? वरोरा येथे केंद्रीय आरोग्य चौकशी पथक दाखल होत आहे.