Click Here...👇👇👇

मोहफुल गोळा करण्यासाठी जाण बेतले जीवावर.

Bhairav Diwase
0 minute read
वाघाच्या हल्ल्यात श्रीधर आत्राम ठार.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
सिंदेवाही:- प्राप्त माहितीनुसार आज दिनांक 3 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास सिंदेवाही तालुक्यातील शिवणी जंगल परिसरात मोहफुल गोळा करण्यास गेलेला एका इसमावर वाघाने  हल्ला करून  ठार केल्याची घटना उघडकीस आली.

      मृतकाचे नाव श्रीधर आत्राम वय 55 राहणार सिरखाडा येथील आहे ग्रामस्थांना याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले वन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली वनपथकाने  घटनास्थळी पोहोचले  पंचनामा ची सुरुवात केलेली आहे. सध्या ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहेत. वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटना स्थळी पोचण्यासाठी निघालेले आहे.