२० वर्षीय युवतीची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- कोरोना च्या महामारीत एकीकडे लोकांचा जीव जात असून दुसरीकडे आत्महत्या करण्याचे प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस वाढत असल्याने समाजमन हेलावून जात आहे अशीच एक दुःखद घटना भद्रावती शहरात आज सकाळी १० ते दुपारी २ वाजे दरम्यान घडली असून आरती जयप्रकाश चटपल्लिवार वय २० राहणार बाजार वार्ड हिने आपल्या राहत्या घरी गळफास घेईन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

जयप्रकाश चटपल्लिवार हे भद्रावती न्यायालयात अटर्नि म्हणून मागील अनेक वर्षापासून कार्यरत असून अत्यंत साधे सरळ असे व्यक्तिमत्व असलेले जयप्रकाश चटपल्लिवार यांची मुलगी आई बाहेर गावी गेल्यामुळे व वडील आपल्या कामावर गेल्यामुळे एकटे असताना दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडली. पण त्या मुलीने नेमकी आत्महत्या का केली? प्रश्न अनुत्तरित असून अवघ्या २० वर्षाच्या वयात लग्नाची वेळ असताना आत्महत्या करावी. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून भद्रावती शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने