Top News

राजुरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यात आगामी काळात होऊ घातलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद तथा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी तालुका काँग्रेस पार्टी च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र जी वैद्य, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजुरा विधानसभा अध्यक्ष श्री. अरुणभाऊ नीमजे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा निरीक्षक श्री. रफिकजी निजामी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक 04/04/2021 रोजी धनोजे कुणबी सभागृह राजुरा येथे १२ वाजता आढावा बैठक पार पडली. 
      या बैठकीत राजुरा तालुक्यात तथा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटन कौशल्य मजबूत करण्या संदर्भात चर्चा झाली. या बैठकीला राष्ट्रवादी तालुका काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष, श्री संतोष देरकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री.  आसिफ सय्यद, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा सौ. अर्चना ददगाड, युवक शहर अध्यक्ष श्री. स्वप्नील बाजुजवार, युवक तालुका उपाध्यक्ष श्री. सुजित कावळे, जगदीश साटोने, जहिर खान, राजू ददगाड, शाहिद शेख, अजय ढूमने, गौरव ढूमने,  साहिल शेख, राहुल धोटे, विजय कुमरे, प्रसाद देशमुख,एकनाथ कौरासे,दिनकर चटकी ,दशरथ कौरासे ,स्वप्निल वाढई ,सचिन मोरे ,प्रमोद कुमरे,राजू भुरुले , करन चिल्का,चाफले भाऊ, श्रीकांत मोरे ,अशोक धुमने,व असंख्य राष्ट्रवादी कांग्रेस पार्टिचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने