अचानक लागलेल्या आगीत झोपडी जळुन खाक. #chandrapur #fire #chimur

आगीमध्ये जीवनावश्यक वस्तू भसंम झाल्याने कुटुंबियांवर कोसळले आभाळ.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चिमूर:- चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या लोहारा येथील खेमराज खोब्रागडे यांची झोपडी जळुन खाक झाली. यात त्यांचे खुप मोठे नुकसान झाले असून अन्न धान्य वस्त्र संपूर्ण जीवनावश्यक वस्तू आगीत भसम झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाबियावर आभाळ कोसळले आहे.

सकाळी पहाटे 7:45 वाजता अचानक गावात आगीचा डोंब उसळला त्यामुळे गावकरी धुराच्या दिशेने धावू लागले. आग आग म्हणत सर्व जण पाणी घेऊन धावू लागले आणि आग विजवू लागले. आग आटोक्यात येताच सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला कारण लोहारा हे गाव दाट वस्तीचा असून लागून असलेली घरे थोडक्यात बचावली. आणि गाव पेटता पेटता वाचले. या आगीची माहिती मिळताच शैलेंद्र पाटील, ईश्वर दहिवले, रतीराम धारने, कृष्णा रामटेके यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग विजवण्यासाठी परिश्रम घेतले. आगीत संपूर्ण झोपडी जळाली असून राखरांगोळी झाली. यात खूप मोठे नुकसान झाले असून खेमराज खोब्रागडे याना आर्थिक मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने