रविंद्र टेकाम (वनरक्षक) जामगिरी यांचे कोरोना आजाराने दुःखद निधन.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरातधक्कादायक प्रकार...... एकिच्या आधार नंबरवर दुसऱ्याच महिलेने घेतली लस.
चामोर्शी:- स्व. रविंद्र धोंडूजी टेकाम (वनरक्षक) जमगिरी बिट ता. चामोर्शी जि. गडचिरोली वय. 42 वर्षे यांचे काल दि. 28 एप्रिल रोज बुधवारला सायंकाळच्या सुमारास गडचिरोली येथे उपचारादरम्यान कोरोनामुळे दुःखद निधन झाले.
सुस्वभावी, शांत, प्रेमळ, मनमिळाऊ, मानवता जपणारे, जनतेचा हाकेला तत्परतेने ओ देणारा असा त्यांचा प्रवास होता. अतिशय शांतपणे, संयमितपणे जनतेचे प्रश्न मांडणारा व्यक्ती म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. स्व रविंद्र टेकाम हे जग सोडून जाणे ही बाब प्रचंड धक्कादायक आहे.
त्यांचा मागे त्यांची पत्नी, एक मुलगा, वडील, भाऊ असा त्यांचा परिवार आहे. परिवारावर कोसळलेले दुःख मोठे आहे. या दुःखातून सावरण्याचे बळ त्यांच्या कुटुंबियांना परमेश्वर देवो.