🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

गजुभाऊ सारख्या देवदुर्लभ कार्यकर्त्याचे अकाली जाणे वेदनादायी:- हितेश गाडगे भाजयुमो जिल्हा संयोजक चंद्रपुर (ग्रा)


राजुरा:- भाजपा पोंभुर्णा तालुक्याचे भाजपा अध्यक्ष गजुभाऊ गोरंटीवार यांच्या सारख्या देवदुर्लभ कार्यकर्त्याचे निधन वेदनादायी आहे.अजुनही या बातमीवर विश्र्वास बसत नाही.

Fast food च्या ह्या युगात विशेषत: राजकीय पक्षात बहुतेकांना सगळचं काही लवकर मिळण्याची अपेक्षा असते. त्यासाठी वाटेल ते करुन मिळवायचे हा प्रघात नेत्यांसाठी, संघटण चालविणाऱ्यां साठी चिंतेचा विषय ठरतोय, पण आ. सुधीर भाऊंनी ठरवुन असंख्य कार्यकर्त्यांना आपल्या विधानसभेच्या पक्षसंघटना बांधणीत त्यांच्या गुणदोषांसकट स्विकारले, त्यांच्यावर अकृत्रिम प्रेम केले. त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या देत पक्षाचे अभ्यासवर्ग, मेळावे, कार्यक्रम, बैठका, प्रशिक्षण वर्ग इत्यादी माध्यमातून संस्कार करीत मोठे केले. पण जनता आणि पक्षसंघटना यांचा समन्वय घडवुन आणणारे कार्यकर्ते व त्यांची शृंखला उभारणारे आ. सुधीर भाऊ यांच्या व्यक्तिगत कार्यकर्ता परिवारातील गजुभाऊ हा पहिल्या फळीतला आवडता कार्यकर्ता होता.
आवडता या अर्थाने नेत्रृत्वाला च नव्हे तर पक्षाला ही नेत्यांवर, पक्षविचारावर प्रचंड श्रध्दा असणारे, विजिगीषु वृत्तीचे, जिद्दी, समर्पित, अहोरात्र परिश्रम करणारे, कुठलेही काम द्या, त्याला नाही म्हणायचे नाही, अशा भावनेतून काम करणारे देवदुर्लभ कार्यकर्ते आवडतात.
असा एक कार्यकर्ता आपल्यापासून व आ. सुधीर भाऊंपासुन काळाने हिरावुन घेतला आहे.
ईश्र्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो...
        त्याच्या गोजीरवाण्या परिवारास  हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, ही प्रभुचरणी प्रार्थना.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत