गणपतभाऊ आपल्या जाण्याने जो सन्नाटा पसरलाय, वातावरण सुन्न करून गेलंय:- आ. किर्तीकुमार भांगडीया

Bhairav Diwase
0


‛सन्नाटा’ या अगदी छोट्याशा बातमीपत्रकातून केलेली सुरवात आपल्या या आकस्मिक सोडून जाण्याने वातावरण सुन्न करून गेलं...!

दैनिक पुण्य नगरीचे चिमूर तालुका प्रतिनिधी, ‛क्रांतीनगरी टाईम्स’ या प्रसिद्ध न्यूज पोर्टल चे संपादक तथा चिमूर तालुका पत्रकार संघाचे सचिव श्री गणपतभाऊ खोबरे यांचे कोरोना मुळे आज पहाटे निधन झाल्याची धक्कादायक बातमी मला माहिती होताच मन सुन्न झाले.

माझ्या नजरेतील एक प्रामाणिक निर्भीड समाजसेवक, रोखठोकपणे आपल्या लेखणीतून सामान्य जनतेच्या व्यथा मांडणारा सच्चा पत्रकार, चिमूर तालुका पत्रकार संघाचा आधारवड होते, चिमूर क्षेत्रात पत्रकारितेत झालेल्या प्रगतीमध्ये त्यांच मोलाचं योगदान आहे. गणपतभाऊ खोबरे यांच्या जाण्याने संपूर्ण चिमूर क्षेत्राततच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी पोहचली आहे.

मागील अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले, गणपतभाऊ खोबरे त्यांनी नुकताच डिजिटल मीडियात प्रवेश घेत, जनसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला मात्र निर्भीड व्यक्तिमत्त्व असलेला, चिमूर तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात प्रसिध्द असलेला हुरहुन्नरी पत्रकार म्हणूनच नव्हे तर विकासकामांचे नियोजन करतांना, राजकीय तथा सामजिक कार्यात आपले सुचना व मार्गदर्शन सतत मिळत राहिले..

परंतू आपले सानिध्य अल्पावधीचेच लाभले असे खेदाने व्यक्त करतोय, मित्ररुपी मार्गदर्शक कोरोनाने हिरावला. त्यांचं आकस्मित झालेलं निधन आमच्यासाठी खूप धक्कादायक आहे. आपण समाजासाठी केलेलं कार्य, आठवणी सदैव आमच्या स्मरणात राहतील.

ईश्वर खोबरे कुटुंबावरील आलेल्या या संकटातून सावरण्यास सामर्थ्य प्रदान करो व त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!

*🙏🏻🌼💐भावपुर्ण श्रद्धांजली 💐🌼🙏🏻*
*●किर्तीकुमार (बंटी) मितेश भांगडीया●*
* _आमदार_
* _चिमूर-७४(जि.चंद्रपूर )विधानसभा क्षेत्र,म.रा._

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)