Top News

भद्रावती शहरातील हनुमान नगर परिसरात आग.

नागरिकांच्या सावधगीरीने अनर्थ टळला.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती शहरातील हनुमान नगर परिसरातील मागच्या बाजूला मोकळ्या मैदानातील झाडेझुडपांना तथा गवताला आग लागल्याची घटना दि.१८ ला दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान घडली.
मात्र येथील नागरिकांनी प्रसंगावधानता दाखवत एकत्र येऊन ही आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला.या घटनेची माहिती भद्रावती नगर परिषदेला देण्यात आल्यानंतर नगर परिषदेचे अग्निशमन दल त्वरित घटनास्थळी पोहचले. त्याआधीच नागरिकांनी जवळपास संपूर्ण आगीवर ताबा मिळविला होता. अग्निशमन दलाने नंतर ही आग पूर्णपणे विझविली. सदर आग कशामुळे लागली हे कळू शकले नाही. हनुमान नगरच्या मागे झाडेझुडपे असलेले मोकळे मैदान आहे. या नगरातील मागच्या भागातील घरांच्या अगदी जवळ ही आग लागून पाहतापाहता पसरली मात्र नागरिकांनी वेळीच सावधपणा दाखवीत आगीवर नियंत्रन मिळविले. या आगीत झाडेझुडपे व गवत वगळता अन्य कोणतेही नुकसान झाले नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने