महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा विनयभंग.

Bhairav Diwase
गटविकास अधिकारी कुणाल उंदीरवाडे यांच्यावर गुन्हा दाखल.

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील महिला वैद्यकीय अधिकारी यांचे लेखी तक्रारीवरून गटविकास अधिकारी कुणाल उंदिरवाडे यांचेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.

सिंदेवाही तालुक्यातील महिला वैद्यकीय अधिकारी यांना गटविकास अधिकारी कुणाल उंदीरवाडे यांनी स्वतःचे कार्यालयात बोलावून त्यांचा विनयभंग करून त्यांना मानसिक त्रास दिल्याची लेखी तक्रार पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाली.

प्राप्त तक्रारीचे अनुषंगाने सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे गटविकास अधिकारी यांचे विरोधात भा द वि कलम 354 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सिंदेवाही चे ठानेदार योगेश घारे यांच्या मार्गदर्शनात सदर गुन्ह्याचा तपास पीएसआय नेरकर करीत आहेत.