गणपतराव आपण गेलात, फार वेदना देऊन गेलात:- डॉ.श्यामजी हटवादेपण आपण आम्हाला जागृत करून गेलात. आपण पत्रकार होतात, आज प्रत्येक पत्रकार श्रद्धांजली वाहतो आहे पण खरी श्रद्धांजली पत्रकारीता लोकशाहीचा चौथा स्तंभ जागृत झाल्यावर आज खऱ्या अर्थाने होईल.
मला असं वाटते गणपतराव चिमुरच्या अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेचा भुकबळी ठरला. आज चिमुरात ग्रामीण रुग्णालयात किमान 25 बेड ऑक्सिजन सहित तयार पाहिजे होते. ऑक्सिजनचे जम्बो सिलेंडरचा पुरवठा पाहिजे होता. किमान ५ बेड वेंटिलेटरनी सुसज्ज पाहिजे होते. औषधाचा पुरवठा व त्यांना आकस्मित सेवेत आणि अत्यंत गंभीर अवस्थेत व्यवस्थित ट्रिटमेंट देणारे उच्चशिक्षित डॉक्टर पाहिजे होते. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण आरोग्य व्यवस्थेबाबत समाधानी ठरलो असतो. परंतु या अभावामुळेच गणपतराव बळी ठरला का ? .यांचे मूल्यांकन होणे गरजेचे आहे.

नागपूर - चंद्रपूर मध्ये कोव्हिट सेंटरला होऊ शकते ते चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात का होऊ शकले नाही. याला जबाबदार कोण? असा सामान्य माणूस प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही. केवळ टीव्हीवर कडक लाँकडाऊनची तंबी द्यायची. मात्र जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा ही अवस्था का आली. प्रशासन का करीत आहे. का प्रत्येक तालुक्यात ह्या व्यवस्था झालेल्या नाही. हजारो लोकांचे मृत्यू झाल्यावर काय फायदा ?असा प्रश्न उपस्थित होईल .
हे मी भाजप - काँग्रेसच्या पलीकडे जाऊन गणपतराव सारख्या तरुण पत्रकारांचा मृत्यू मनाला बोलकं करून गेला. खरोखरच गणपतराव अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेची भुखबळी ठरला, हे मात्र सत्य आहे. पुण्यनगरी चिमूर तालुका प्रतिनिधी,तथा सचिव चिमूर तालुका पत्रकार संघ, मा.श्री. गणपतराव खोबरे एक प्रामाणिक, निर्भिड, समाजसेवक सच्चा पत्रकार गेला.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
💐😢💐
*भावपूर्ण श्रद्धांजली...*
*         💐😢💐
         *         ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
         *                  -: शोकाकुल :-

      _डॉ. श्यामजी हटवादे 
(नेरी, चिमुर)
भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य
●●●●●●●●●●●●●●●●●●

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने