मा. रमाकांतभाऊ लोधे जि. प सदस्य यांनी केले कोरोना लसीचा डोस.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- आज दिनांक २३|०४|२०२० रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र वासेरा येथे दुपारी मा.रमाकांतभाऊ लोधे जि.प सदस्य,चंद्रपुर तथा अध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटी, सिंदेवाही यांनी कोरोना लसीकरण करुन घेतले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी शासन नियमावलीच्या आधीन राहुन लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन रमाकांतभाऊ लोधे यांनी जनतेला सांगितले. रमाकांतभाऊ लोधे हे युवा नेतृत्व कार्यकर्ते असुन कोरोना जनजागृती व मी जबाबदार या संकल्पनेला अनुसरुन एक आदर्श ठेवत लसीकरण केले. बदलत्या वातावरणामुळे ताप सर्दी खोकला याचे प्रमाण वाढत असते तेव्हा नागरिकांनी खुप उशीर न करता कोविड चाचणी तसेच कोविड लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

जनता कर्फ्यु सुरु असल्यामुळे बाहेर फिरण्याचा मोह आवरुन नेहमी घराबाहेर पडतांना मास्क लावुन जावे. हात नेहमी स्वच्छ ठेवुन सॅनिटायझरचा वापर करावे व गर्दीच्या ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवुन स्वतः ची काळजी स्वतः घ्यावी असेही ते यावेळी आपले मत व्यक्त केले होते.