महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यास हजारो लोकांचे जाणार बळी?

Bhairav Diwase
0
वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली?आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची कबुली?
मुंबई:- महाराष्ट्रात सध्या कोरोनामुळे परिस्थिती बिकट झाली असून आरोग्य यंत्रणा देखील कोलमडत आहे. कोरोना रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. परंतु यात महत्वाचे म्हणजे जर ऑक्सिजनचा तुटवडा आज ज्या पद्धतीने जाणवत आहे त्यात पुन्हा येणाऱ्या दिवसात याच पद्धतीने कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर ऑक्सिजन अभावी हजारो रुग्णांचा बळी जाण्याची शक्यता असल्याची भीती निर्माण झाली आहे. या संदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भीती व्यक्त केली आहे.

ऑक्सिजन हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. राज्याचे स्वतःचं साडेबाराशे मेट्रीक टन उत्पादन आहे. शिवाय साधारणपणे ३०० मेट्रिक टन आपण बाहेरून आणतो आहोत. राज्यात दररोज साडेपंधराशे मेट्रीक टन ऑक्सिजनच वापर आहे. आणि हे प्रमाण खूप मोठं आहे. पण रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर ऑक्सिजनसाठी पुढे अडचण येऊ शकेल असे टोपे म्हणाले.

आता येत्या ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊनमध्ये आणखी कडक निर्बंध केलेले आहेत . विनाकारण बाहेर रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना पायबंद केलं करण्याची व्यवस्था पोलिसांकडून होतं आहे. किराणा दूकान हे ७ ते ११ या दरम्यान सुरु राहणार असून जिल्हाधिकारी स्तरांवर यामधे बदल करण्याचे अधिकार असल्याची प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)