Top News

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने ऑक्सिजन चा तुटवडा भरून निघेल.

१५७ मेट्रिक टन ऑक्सिजनचा विदर्भातील रुग्णांना होणार फायदा.
Bhairav Diwase. April 23, 2021
नागपूर:- भाजप चे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी या संकटकाळी राजकारण न करता प्रतेक्ष मदतीला सुरुवात केली. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने बाहेरून ऑक्सिजन आणण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. भिलाई नंतर आता विशाखापट्टणम हून देखील दररोज ऑक्सिजन मिळणार आहे. त्यामुळे दररोज १५७ मेट्रिक टन ऑक्सिजन मिळणार असून त्याचा फायदा विदर्भातील रुग्णांना होणार आहे. विशाखापट्टणम येथील आरआयएनएल प्लॅन्टमधून राज्याला दररोज ९७ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. भिलाई येथील स्टील प्लॅन्टमधून दररोज ६० टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने