🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्सची घोषणा.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची शिष्ठाई यशस्वी.
Bhairav Diwase. April 23, 2021
नागपूर:- महाराष्ट्राला कोरोना विषाणू संसर्गाचा फटका बसला आहे. दुसऱ्या लाटेतही महाराष्ट्र कोरोनाशी लढतो आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर्ससाठी महाराष्ट्र केंद्राकडं आर्जव करत आहे. महाराष्ट्राच्या संकटाच्या परिस्थिती आंध्र प्रदेश महाराष्ट्राच्या मदतीला धावला आहे. महाराष्ट्राला मदत करावी अशी विनंती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना केली होती. जगनमोहन रेड्डी यांनी महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा केली.
नितीन गडकरींची जगनमोहन रेड्डी यांच्याशी चर्चा.....

नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीसंदर्भात आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्याचर्चेनंतर जगनमोहन रेड्डी यांनी महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा केल्याची माहिती नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत