Click Here...👇👇👇

गजानन गोरंटीवार अनंतात विलीन; साश्रू नयनाने भावपूर्ण निरोप.

Bhairav Diwase
आता उरल्या फक्त आठवणी......
Bhairav Diwase. April 29, 2021
पोंभुर्णा:- काल बुधवार हा दिवस पोंभूर्णा तालुक्यासाठी अत्यंत दुःखदायक वेदना देणारा ठरला. भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा पोंभुर्णा नगरपंचायत चे प्रथम नगराध्यक्ष पोंभुर्णा शहराच्या विकासाचा महामेरू गोरगरीब भटक्या समूहाच्या गळ्यातला ताईत असलेले मनमिळाऊ स्वभावाचे धनी श्री. गजानन भाऊ गोरंटीवार, यांचे काल दुपारच्या सुमारास चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात मूत्रपिंडाच्या गंभीर आजाराने उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची दुःखद वार्ता वार्‍यासारखी तालुक्यात व जिल्ह्यात पसरली. आणि तालुक्यातील नागरिकांचा विश्वासच बसेनासा झाला.
त्यांच्या स्वगावी पोंभुर्णा येथे आज गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या विभागाचे आमदार तथा माजी अर्थमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार हे काल बुधवारी पोंभूर्णा येथील त्यांच्या घरी जाऊन शोकसंवेदना व्यक्त केली. गजानन गोरंटीवार यांच्या रूपाने तालुक्यातील कोहिनूर हिरा आपण गमावल्याचे दुःख व्यक्त करत आपली शोकसंवेदना जाहीर केली.
अशा रूपाने एक कोहिनूर हिरा काळाच्या पडद्याआड गेला. याचे दुःख सर्वांच्याच चेहर्‍यावर दिसत होते.