💻

💻

यंदाची आयपीएल 2021 स्थगित! बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्लांची माहिती.


Bhairav Diwase.   May 04, 2021
मुंबई:- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आयपीएल 2021 मधील काही संघांच्या खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. चेन्नई सुपर किंग्ज न एक मॅच खेळण्यास देखील नकार दिला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल 2021 स्थगित करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ‘एएनआय’ला दिली आहे.

IPL suspended for this season: Vice-President BCCI Rajeev Shukla to ANI #COVID19 
pic.twitter.com/K6VBK0W0WA
— ANI (@ANI) May 4, 2021


आयपीएलच्या या वर्षीच्या स्पर्धेवर कोरोनाचे संकट वाढले होते. एकामागोमाग एक धक्कादायक बातम्या आयपीएलच्या मैदानातून समोर येत आहेत. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपरकिंग्स (CSK) या दोन संघातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यानंतर संघ व्यवस्थापनाने उद्याचा (दि.5) सामना खेळण्यास असमर्थता दाखवली होती

चेन्नईचे बॉलिंग प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि टीमचे सीईओ एस विश्वनाथन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संघ व्यवस्थापनाने उद्याचा सामना खेळण्यास असमर्थता दाखवली. लक्ष्मीपती बालाजी यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात असलेले संघातील खेळाडूंना पुढील तीन चाचण्या जोपर्यंत निगेटिव्ह येत नाहीत तोपर्यंत संघ सामना खेळू शकत नाही, अशी भूमिका चेन्नई सुपरकिंग्ज संघाने घेतली.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल 2021 स्थगित करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ‘एएनआय’ला दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत