जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

कोरोनामुळे मामाच्या गावाला यंदाही "नो एन्ट्री"


Bhairav Diwase. May 04, 2021
साधारणपणे एप्रिल व जुन महिन्यात दरवर्षी वार्षिक परीक्षा होतात. वार्षिक परीक्षा संपल्या की, मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीचे वेध लागतात. त्यानंतर मामाच्या गावाची ओढ, आपलेपण, मामाच्या गावाला जाऊन काय-काय करायचे, मजा करायची, याचे चित्र रंगवणारी बालमने कोरोनामुळे मामाच्या गावाला जाण्यापासून हिरमुसली आहेत.

वर्षभरातील अभ्यासाचे ओझे दूर सारून सुट्टीचा मनमुराद आनंद लुटायचा आणि पुढील शैक्षणिक प्रक्रियेसाठी तयार व्हायचे. अनेक पिढ्यांनी हा आनंद लुटला, परंतु यंदा कोरोनामुळे मामाच्या गावाला गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही "नो एन्ट्री" असल्याने चिमुकल्यांना मामाच्या गावाची ओढ कायम आहे.

पूर्वीची माैज झाली फिकी......

मामाचे गाव म्हटले की, पूर्वी वेगळे जग दिसायचे. परंतु आता मामाचे गावही आधुनिक झाले आहे. वाड्यांची जागा आता इमारतींनी घेतली आहे. त्यामुळे अनेक बालके सुट्टीच्या दिवसात मामाच्या गावाकडे जाण्यास धजत नाही. मनसोक्त बागडणे, रानोरानी, गावरान आंब्याच्या रसाचा आस्वाद घेणे, उन्हात पाखरासारखे फिरणे, नदीत मनसोक्त पाेहणे यासारखी माैज आता राहिली नाही.

ती माैज आता फिकी झाली आहे. तरीसुद्धा अनेक बालके पूर्वीसारखे मामाच्या गावात उन्हाळ्याची सुट्टी घालवतात. परंतु यंदासुद्धा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने जिल्हाबंदी केली आहे. त्यामुळे बालकांना तब्बल दुसऱ्याहीवर्षी मामाच्या गावात 'नो एन्ट्री' आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत