Top News

25 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडुन मृत्यू.

मित्रांसोबत आंघोळीसाठी जाणे बेतले जीवावर.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
सिरोंचा:- मित्रांसोबत आंघोळीसाठी गेलेल्या एका 25 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी 18 मे रोजी सायंकाळी 4 ते 5 वाजताच्या सुमारास सिरोंचा प्राणहिता नदीपात्रातील घाटावर घडली. राहुल नारायण सोलाम वय 25 रा.जिमलगट्टा ता अहेरी असे मृतक युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार राहुल नारायण सोलाम हा युवक सिरोंचा येथे ट्रॅक्टर ड्रॉईवर म्हणून काम करत होता तो आणि त्याची पत्नी दोघेही सिरोंचा येथे होते. आज सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास तो मित्रांसह आंघोळीसाठी प्राणहिता नदीवरील सिरोंचा घाटावर गेला. नदीपात्रात आंघोळ करीत असताना राहुल खोल पाण्यात उतरला. त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती सिरोंचा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पोलिस जवान मनीष, आणि प्रकाश घोडके यांनी स्वतः पाण्यात शोधमोहीम सुरू केली. त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास सिरोंचाचे पोलिस निरीक्षक अजय अहिरकर यांचा मार्गदर्शनाखाली ASI बिस्वास करीत आहे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने