Click Here...👇👇👇

रामपूर येथे 44 वर्षे वरील नागरिकांना कोविड लसीकरणाची सोय उपलब्ध करून द्या.

Bhairav Diwase
1 minute read
संकल्प फाउंडेशन रामपूर तर्फे ता. वैद्यकीय अधिकारी राजुरा यांना निवेदन.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- रामपूर हे राजुरा शहराला लागुन असलेल मोठा गाव आहे तरी या गावात लसीकरणाची कोणतीही सोय उपलब्ध नाही त्यामुळे येथील नागरिकांनी ईतरत्र जावे लागत आहे त्यामुळे 44 वर्षावरील वयोवृद्ध नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेत संकल्प फाउंडेशन रामपूर या सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कढोली यांना निवेदन देऊन लसीकरण सेंटर चालु करूण लस उपलब्ध करून देण्यात यावे. 
यासाठीी निवेदन दिले यावेळी प्रामुख्याने संकल्प फाउंडेशन सुरज गव्हाने, उज्वल शेंडे, ओमप्रकाश काळे, अक्षय डखरे, दिपक झाडे, शुभम बोबडे, गितेश कौरासे, दिनेश वैरागडे, उपस्थित होते.