45 वर्षावरील प्रत्येक नागरिकांनी कोविड लसीकरण करून घ्यावे- सभापती सुनील उरकुडे

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- गोवरी येथे जि. परिषद शाळा या ठिकाणी लसीकरणची सुरुवात सभापती सुनील उरकुडे यांच्या हस्ते करण्यात आली. गावातील ४५ वर्षांवरील सर्वच नागरिकांनी कुठलीही भीती न बाळगता कोविड लसीकरण करून घेण्याचे आवाहन सभापती सुनील उरकुडे यांनी याप्रसंगी केले. नागरिकांना कमी अंतरावर लसीकरण घेता येण्यासाठी या नवीन उपकेंद्रावर लसीकरणाची सोय उपलब्ध केल्याचे त्यांनी सांगितले. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षित  आरोग्यासाठी आरोग्य प्रशासनाने  दिलेल्या सूचनेचे पालन करण्याची विनंती सभापती सुनीलभाऊ उरकुडे यांनी केली.
  लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी  सरपंच आशा उरकुडे, ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ कास्वाटे, कढोली,  phc mo डॉ विपिन ओडेला अमोल कोसुरकर, हरीचंद्र जूनघरी, बबन उरकुडे यांच्यासह सर्व आरोग्य सेवक कर्मचारी ,आशा वर्कर यांची उपस्थिती होती.