पंतप्रधान मोदी सरकारच्या 7 वर्षांच्या वर्षपुर्तीवर ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरीला 5 ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध.

Bhairav Diwase
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- देशातील सर्वात सशक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये देशातील सरकारला ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. भारतावर कोरोना चे भयानक संकट आलेले असतांना आज केंद्र सरकार ताकतीने लढत आहे. पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ते आपले योगदान समाज सेवेसाठी देत आहे. केंद्र सरकार ला ७ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी ला 5 ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिले. माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे 5 ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले.

यावेळी तालुका अधिकारी डॉ. संदीप बांबोळे, डॉ. गिरी, पंचायत समिती सभापती येज्जेवार, बबन निकोडे, निलेश संगमवार साईनाथ मास्टे, चेतन गौर, राकेश पून, सुनील फुकट, सुभाष माठुरवार, जिल्हा परिषद सदस्या स्वाती वडपल्लीवार, तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.