Top News

कृषी विभागाच्या धाडीत 70 लाखाचे बोगस कापूस बियाणे जप्त.

कृषी विभागाने नोंदविला गुन्हा.

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- कृषि विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने गोपणीय माहितीच्या आधारे चंद्रपूर शहराच्या बाबुपेठ परिसरातील समता चौक, गणेश एजन्सी प्लॉट येथे 1 मे रोजी धाड टाकली असता तेथे अनधिकृत मान्यता प्राप्त नसलेले संशयित कापुस (HTBT) बियाणे पॉकिग सुरु असल्याचे आढळून आले.

या धाडीमध्ये अभिजीत मानिकचंद्र दुर्गे यांनी आरोपी सोहील अब्दुल तसलिम शेख, जलनगर, चंद्रपुर याला भाड्याने दिलेल्या रुममध्ये अनधिकृत मान्यता प्राप्त नसलेले संशयित कापुस (HTBT) बियाणे, खाली पॉकेट व पॉकिग मशिन आढळुन आले. संशयित कापुस बियाण्यामध्ये राघवा-9 , मेघना-45, अरुणोदया, पवनी सिडस व दंबग तसेच खुले बियाणे मोठया प्रमाणावर आढळुन आले. सध्याच्या शासकिय दरानुसार सदर जप्त केलेले बियाण्याची अंदाजित रक्कम 68 ते 70 लाख रुपये असुन या प्रकरणात कृषि विभागा मार्फत गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक श्री. चालुरकर करीत आहेत.

सदर कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद साळवे व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जिल्हयातील शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत कृषि केंद्र धारकाकडुनच मान्यता प्राप्त बियाणे खरेदी करावे. तसेच कोणत्याही अनोखळी व्यक्तीकडुन प्रतिबंधित कापुस बियाणे खरेदी न करण्याचे तसेच या संबंधी अनाधिकृत कृषि निविष्ठा विक्री करीत असल्याची माहीती मिळाल्यास दुरध्वनी क्रंमाक 07172-271034 किंवा 07172-253297 वर तसेच तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पं.स. व पोलीस विभागास माहीती कळविण्याचे आवाहन भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

कृषि विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाचे अधिकारी शंकर किरवे, जिल्हा गुण नियत्रण निरीक्षक प्रशांत मडावी, तालुका कृषि अधिकारी चंद्रकांत ठाकरे, यांनी चंद्रपुर शहर पोलीस स्टेशन येथिल पोलीस निरीक्षक श्री. अंभोरे यांच्याशी संपर्क साधून उपनिरिक्षक श्री. चालुरकर व श्री. मोरे यांच्या सहकार्याने संबधित ठिकाणी धाड टाकली. सदर धाडीमध्ये कृषि अधिकारी सुशिल आडे, साकेत बावनकुळे, अमोल उघडे, मकरंद लिंगे, जया व्यवहारे यांचे सहकार्य लाभले असल्याचे कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांनी कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने