भाजपचे समाधान आवताडे विजयी!
पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा ३ हजार ७३३ मतांनी पराभव करून विजय संपादन केला आहे.
त्यामुळे राज्यातील महा विकास आघाडी ला मोठा झटका बसलेला आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडी कडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ महाविकासआघाडी तील दिग्गज मंत्री पंढरपुरात तळ ठोकून होते
तरी ही महाविकास आघाडीचे उमेदवार यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे गेल्या वर्षभरात ज्या प्रकारे माहाविकास आघाडीकडून जनतेची घोर फसवणूक करून जनतेला लाईट बिलाचा जसा शॉक दिला तसाच शॉक मंगळवेढा पंढरपुरातील मतदारांनी महाविकास आघाडीला दिला आहे.