सरपंच अनुताई ताजने यांच्या हस्ते उद्घाटन.
कोरपना:- कोरपना तालुक्यातील नारंडा येथे सामाजिक सभागृहात ग्रामपंचायत नारंडा व समस्त ग्रामवासी यांच्या सहकार्याने संस्थत्मक अलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली.यावेळी या कक्षाचे उद्घाटन नारंडा ग्रामपंचायतीचे सरपंच सौ.अनुताई ताजने यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी गावचे पोलीस पाटील नरेश परसुटकर,प्रमुख पाहुणे माजी सरपंच वसंता ताजने,ग्रामपंचायत सदस्य रुपाली उरकुडे,रंजना शेंडे,शालिनी हेपट,बापूराव सिडाम,अनिल शेंडे उपस्थित होते.
गावात अनेक गरीब कुटुंब आहेत त्यामुळे त्यांचे घर खूप छोटे आहेत,एखाद्या व्यक्तीला कोरोनाचे लक्षणे आढळल्यास तो गृह अलगीकरणात राहू शकत नाही,तसेच त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयाना सुद्धा कोरोना होण्याची दाट शक्यता असते याकरिता ग्रामपंचायत नारंडा व सर्व ग्रामवासी यांच्या सहकार्याने संस्थात्मक अलगीकरणाची स्थापना करण्यात आली आहे.
आपल्याला कोरोनाला हद्दपार करायचे झाल्यास शासनाने जे नियम घालून दिले आहेत ते पाळणे अतिशय आवश्यक असून,आपल्याला सामाजिक अंतर राखणे,मास्कचा वापर करणे,सॅनिटाइझर वापरणे,व लसीकरणात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करणे आवश्यक असून तसेच कोणत्याही नागरिकांना काही कोरोनाचे सौम्य लक्षणे आढळून आल्यास त्यांनी अलगीकरणात राहणे आवश्यक आहे,तेव्हाच आपण कोरोनावर विजयी मिळवू असे प्रस्ताविक भाषणात भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी सांगितले.
यावेळी नागोबा पाटील उरकुडे,सुरेश शेंडे, गजानन चतुरकर, मारोती बोबडे,मारोती शेंडे,संतोष वांढरे,मारोती बोबडे,बाळा गाडगे यांची उपस्थिती होती.
तसेच अलगीलरण कक्षाच्या निर्मितीसाठी अजय तिखट,सत्यवान चामाटे, अनिल मालेकर यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे संचालन प्रवीण हेपट यांनी केले.