IPL 2021: कोलकाताच्या खेळाडूंना कोरोनाची बाधा; आजचा सामना पुढे ढकलला.

Bhairav Diwase

मुंबई:- आयपीएल २०२१ स्पर्धेत आज कोलकाता नाइटराइडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगणार होता. मात्र या सामन्यापूर्वी दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्याने सामना पुढे ढकलण्यात आला आहे. करोनामुळे खेळाडूंच्या गोटात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आयपीएल स्पर्धा करोनाच्या सावटाखाली होत असल्याने खेळाडू बायो बबलमध्ये खेळत आहेत. तसेच कडक नियमावली लागू करण्यात आली. अशात खेळाडूंना करोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आता कोलकाता संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरीयर या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला याबाबतची माहिती दिली आहे. कोलकाता संघातील दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बंगळुरुचे खेळाडू त्यांच्याविरोधात मैदानात उतरण्यास तयार नाही. वरुण आणि संदीपची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आजचा सामना पुढे ढकलण्यात आली आहे', असं एएनआयला बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.