जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🖼️
🖼️🇮🇳
🇮🇳✌️

✌️

✌️


🎂 🎂🎂🙏🟥

"प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना" हि योजना बनावट.

ऑनलाईन फसवणुकीपासुन सावध.

ब्लॉगस्पॉट वेबपेज तयार करून फसवणुकीचा प्रयत्न.
Bhairav Diwase. May 26, 2021
कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय होतांनाचे दिसून येत आहे. सोशल मिडीयाद्वारे बनावट ब्लॉगस्पॉट वेबपेज तयार करुन फसवणुकीचा प्रयत्न करून सायबर गुन्हेगारांकडून सर्व सामान्य लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहेत.

प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना २०२१ या मथळयाखाली ब्लॉगस्पॉट वेबपेज तयार करुन त्यात खालील प्रमाणे बेरोजगार लोकांना फेक लिंक पाठवुन त्यामध्ये प्री - रजिस्ट्रेशन करण्यासाठी फॉर्म भरण्याचा आग्रह करण्यात येत आहे. यावरून पोलीस स्टेशन रामनगर येथे कलम ४६८ भादंवि सहकलम ६६ (क), ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तरी चंद्रपूर जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नागरीकांनी अशा भुलथापास बळी न पळता कोणत्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन आणि वैयक्तिक माहिती शेअर न करता सजग राहून सायबर गुन्हेगारीस प्रतिबंध करून मदतीसाठी नजिकच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत