Click Here...👇👇👇

भाजयुमो सोशल मिडिया जिल्हासह- संयोजक चंद्रपुर (ग्रामीण) सागर धुर्वे यांचेकडून आसन (खु) येथे माॅस्कचे वाटप.

Bhairav Diwase
1 minute read
लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात सर्वत्र माॅस्कचे वितरण.

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
कोरपना:- राज्याचे माजी अर्थमंत्री तथा लोकलेखा समिती प्रमुख, लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यात कोरोणाचे वाढते सावट लक्षात घेऊन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक सकारात्मक कार्य हाती घेतले आहे. यामधीलच एक, संपूर्ण जिल्ह्यात माॅस्कचे वितरण करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज कोरपना तालुक्यातील आसन (खु) येथे राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजयभाऊ धोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे व भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमोचे सोशल मिडिया जिल्हासह- संयोजक चंद्रपुर (ग्रामीण) भाजपा युवा नेते राजुरा विधानसभा क्षेत्र चे समाज सेवक कु सागर धुर्वे यांनी स्थानिकांना माॅस्कचे वाटप केले.