Top News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गडचांदूर शाखा तर्फे मास्क चे वाटप.


💐
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरोना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने काही नियम व अटी घालून दिल्या असून घरीच राहून या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरीकांनी मास्क वापरण्याची सूचना केली आहे, परंतु गोर गरीब नागरिक आर्थिक संकटात असून जनजागृती अभावी ग्रामीण भागात त्यांना मास्क चे महत्त्व लक्षात आले नाही.
💐
💐
त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गडचांदूर शाखा तर्फे दोन दिवस घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात आली व मास्क घालण्याचे फायदे सांगण्यात आले। अनेक प्रभागात गोर गरीब व बिना मास्क लावता फिरणाऱ्या नागरिकांना दोन हजार मास्क चे विनामूल्य वाटप करण्यात आले. प्रभाग एक व प्रभाग सहा मधील महिला, पुरुष व बालकांना मास्क वितरण कार्यक्रम घेण्यात आला होता। यावेळी कृष्णा वायकोर, आकाश किचेकर, अथर्व नामेवार, वैभव डोहे यांचे सह सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार उध्दव पुरी उपस्थित होते
🆘

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने