वडिलांची हत्या करून मृतदेह टाकला रेल्वेरुळावर

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा: वडिलांची हत्या करून मृतदेह रेल्वे रुळावर टाकून तो अपघात असल्याचा बनाव केल्याची कबुली निखिल धानोरकर या मुलाने दिली आहे. ही घटना जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या सिंधी येथील आहे.
येथील विरुर स्टेशनच्या हद्दीत रेल्वे रुळावर तिरुपती तातोबा धानोरकर वय(43) या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. यासंदर्भात तपास सुरू केला असता, मुलाने वडिलांचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. पोलिसांनी संशयावरून त्याला बोलते केले असता त्याने खुनाची कबुली दिली