Top News

नागरिकांनी ताप, अंग दुखणे, सर्दी जाणवल्यास तात्काळ कोविड RTCPR चाचणी करावी

भारतीय जनता पार्टी तर्फे मोफत RTPCR चाचणी केंद्र सुरू.

माजी मंत्री आम.सुधीरभाऊ मुंगटीवार यांच्या माध्यमातून

वरोराकरांनी मानले मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आभार.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
वरोरा:- राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून वरोरा येथील जूनी नगर परिषद इमारत येथे मोफत कोविड RTPCR चाचणी केंद्र आज 18 मे मंगळवार पासून नागरीकांच्या सेवेत सुरू करण्यात आले आहे.

आज या केंद्राचे उद्घाटन वरोरा नगर परिषदचे मा नगराध्यक्ष मा.श्री अहेतेशामजी अली यांच्या हस्ते आज पार पडले. या वेळी प्रामुख्याने बाबा साहेब भागडे, डॉ भगवानजी गायकवाड़, सुरेशजी महाजन, विनोदजी लोहकरे, सौ सुनीताताई काकड़े, दिलीप घोरपड़े, सुनीलजी समर्थ, परसराम मरस्कोलहे, जगदीशजी तोटावार, राजेशजी साकुरे, महेशजी श्रीरंग, राहुल बांदुरकर, बाबा कालमेघ, आकाश भागडे, अक्षय भिवदरे, अमित आसेकर, श्रीकांत आत्राम, अभिजित गयनेवार, दादू खंगार, प्रतीक काळे, कादर शेख, अजयजी वाटकर, उपस्थित होते.
कोरोना RTPCR चाचणी केल्यावर रिपोर्ट यायला 3/4 दिवस लागतात या कालावधीत कोरोना ग्रस्त रुग्ण घरी न राहता रोजच्या कामात व्यस्त असतो अशा परिस्थितीत पोझिटीव्ह रुग्णापासून इतर लोकांना बाधा होउ शकते सोबतच चाचणी रिपोर्ट उशिरा आल्याने त्या वर उपचार सुद्धा सुरू होत नाही, यात रुग्णाची प्रकृती गंभीर होत जाते. या सर्व परिस्थिती लक्षात घेत माजी मंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने सदर चाचणी केंद्र नागरिकांच्या सेवेत सुरू करण्यात येत आहे, या प्रसंगी मा.अहेतेशामजी अली नगराध्यक्ष न प वरोरा, यांनी माजी मंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आभार ही व्यक्त केले.
या कोविड चाचणी केंद्रावर सकाळी 11 ते दु 3 वाजे पर्यंत चाचण्या करण्यात येणार आहेत. चाचणीचा रिपोर्ट दुसऱ्याच दिवशी नागरिकांना देण्यात येणार आहे. या केंद्रावर आज पासूनच चाचणीला सुरवात झाली व नागरिकांनी तब्येतीत फरक जाणवल्यास लगेच RTPCR टेस्ट करण्याचे भारतीय जनता पार्टी वरोरा आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने