(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- शिवछावा फाउंडेशन ता.पन्हाळा जि.कोल्हापूर यांच्या मार्फत ग्रामीण भागातील साहित्य क्षेत्राकडे वळणा-या विद्यार्थी,नवयुवक,पालक,शिक्षक तसेच साहित्याप्रती निष्टा असणा-या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी व नवोदित कथा लेखकासाठी संधी मिळुन चांगले लेखक निर्माण होण्यासाठी कथालेखन या राज्यस्तरीय खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या राज्यस्तरीय आॅनलाइन कथा लेखन स्पर्धेमध्ये जनार्दन प्रभाकर वाघमारे (जि.सोलापूर)यांच्या ' व्हॅलेन्टाईन डे-एक निस्वार्थ प्रेम' या कथेला प्रथम क्रमांक ,धनराज रघुनाथ दुर्योधन( जि.चंद्रपूर) यांच्या ' मानवता हाच खरा धर्म ' या कथेला द्वितीय क्रमांक तर साईप्रसाद संजय बोभाटे (जि.कोल्हापूर) यांच्या ' संघर्षगाथा- आनंदीबाईच्या आदर्श शाळेची ' या कथेला तृतिय क्रमांक मिळाला आहे. प्रथम,द्वितीय,तृतिय क्रमांक मिळविणा-या स्पर्धकाना पुस्तके,सन्मानचिन्हे व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले. या कथा लेखन स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून अनेक स्पर्धकानी सहभाग नोंदविला. कोरोना महामारीच्या आपत्तकालीन परिस्थितीत शिवछावा फाउंडेशनने हाती घेतलेल्या सामाजिक जाणीव आणि संवेदना निर्मिती उपक्रमाबद्दल विजेत्या स्पर्धकानी फांउंडेशनचे अभिनंदन केले.शिवछावा फाउंडेशनचे अध्यक्ष अमित पाटील तसेच संदिप पाटील यांनी विजेत्याना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.