जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🖼️
🖼️🇮🇳
🇮🇳✌️

✌️

✌️


🎂 🎂🎂🙏🟥

दुकानाबाहेर लिहिलं "शटर बंद असेल तर कॉल करा, आम्ही आत्म्याप्रमाणे इथेच भटकत आहोत"; पोलिसांनी दिलं भन्नाट उत्तर. Social media Viral


सोशल मीडियावर अनेकदा काही मजेशीर गोष्टी व्हायरल होत असतात. कोरोनाच्या या कठीण काळात सोशल मीडियावर लोक हसणे आणि हसवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत असतात. अशातच सोशल मीडियावर सध्या एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. त्या फोटोत एका दुकानाबाहेर असलेली भन्नाट सूचना लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. जी पाहून तुम्हीही दिलखुलासपणे हसाल.
व्हायरल होणाऱ्या या सूचनेत लिहिलंय की, "जर माझ्या दुकानाचं शटर बंद असेल तर आम्हाला संपर्क करा. आम्ही आत्म्याप्रमाणे इथेच कुठेतरी भटकत आहोत" सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होताच आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी शेअर केला. त्यासोबत गंमतीदार रिप्लाय देत म्हटलंय की, या भटकती आत्म्याचा लवकरच पोलिसांची भेट होईल असं त्यांनी लिहिलं आहे.
सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. लोक एकमेकांना हा फोटो शेअर करत आहे. त्यासोबत मजेदार कमेंट्सही करत आहेत. या फोटोला आतापर्यंत २ हजाराहून अधिक लोकांनी लाईक्स केलं आहे. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, आता त्याचा आत्मा जेलमध्ये भटकेल. तर दुसऱ्या या आत्म्याला शांती लाभो असं म्हटलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत