युवासेनाचा सामाजिक उपक्रम

Bhairav Diwase
एक हाक ,युवासेनेचा मदतीचा साथ


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- कोरोना च्या बिकट परिस्थितीत गरजुंना मदत मिळावी या मा. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे,युवासेना प्रमुख मा.आदित्यसाहेब ठाकरे यांच्या समाजहिताय प्रेरणेने ,गरजुंना फुल ना फुलाची पाखळी मदत का होईना या विचाराने युवासेना कार्यकारिणी सदस्य मा. रूपेश दादा कदम, जिल्हा विस्तारक मा. नित्यानंदजी त्रिपाठी साहेब ,शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे, युवासेना जिल्हाप्रमुख प्रा.निलेशजी बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना तालुका राजुरा च्या वतीने राजुरा तालुक्यातील विविध ठिकाणी गरजुंना मागील १० दिवसापासून अन्नदान, फळ वाटप, मास्क वाटप, तसेच ज्युस यांचे वितरण करण्यात येत आहे.

कोरोना च्या या संकटाच्या वेळेस रोज काम करून पोट भरण्यार्या लोकोंना दोन वेळच्या जेवणाची समस्या उद्भवलेली आहेत, मोलमजुरी करणार्यां गरीब गरजू कडे हाताला काम नसल्याकारणाने पोटभर जीवनाच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने युवासेना राजुरा च्या वतीने या गरजूंना अन्न , फळे, ज्युस पुरविण्याचे कार्य मागील काहि दिवसांपासून सुरू आहे.यापुढेहि जनसेवेचा ध्यास मनात बाळगून युवासेनेचे च्या वतीने गरजुंना मदतीचे कार्य सुरू राहणार असा निर्धार युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. निलेश बेलखेडे यांनी सर्व युवासेना युवा सैनिकांच्या वतीने  केला आहे. 


या सामाजिक कार्याला यशस्वी करण्याकरिता  युवासेनेचे कुणाल कुडे (उपसरपंच सास्ती) , बंटी मालेकर, (उपतालुका प्रमुख), प्रविण पेटकर ( समन्वयक), वतन मादर, श्रि बुटले, पंकज बुटले,स्वप्नील मोहरले, श्रीनाथ बोलूवार, गौरव चन्ने, निखिल गिरी, गणेश चैथले, शुभम भोयर, अंकुश बुटले, सौरभ चेन्ने,  यां युवासैनिक पुढाकार घेऊन मेहनत घेत आहेत .