Top News

शंकरपूर-विसोरा मार्गावर भीषण अपघात, टिप्पर नदीत कोसळला.

Bhairav Diwase. May 04, 2021
गडचिरोली:- जिल्ह्यात देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर-विसोरा मार्गावरील गाढवी नदीच्या पुलावर भरधाव वेगातील टिप्पर व ट्रॅक्टरची धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये देसाईगंजकडून अरततोंडीकडे जाणारे दुचाकीस्वारही अपघातग्रस्त वाहनांवर धडकले. या भीषण अपघातात धडकेनंतर टिप्पर गाढवी नदीपात्रात कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात ३ एप्रिल रोजी दुपारी २ च्या सुमारास घडला.
टिप्परचालक मंगेश बाळबुद्धे (वय २०) रा.भूयार ता.पवनी व प्रवीण मसराम (वय ३३) रा. निलज ता. पवनी हे एमएच ४० बीएल १९२२ या क्रमांकाच्या टिप्परने शंकरपूरवरून देसाईगंजकडे येत होते. तर एमएच ३३ एफ ३१२६ या क्रमांकाचा ट्रॅक्टर देसाईगंज येथून डोंगरमेंढाकडे जात असताना शंकरपूर-विसोरा मार्गावरील गाढवी नदीच्या पुलावर दोन्ही वाहनांची धडक झाली. यामध्ये ट्रॅक्टरचा चेंदामेंदा झाला. यावेळी ट्रॅक्टरचालक गुरुदेव प्रधान (वय ५०) रा. जुनी वडसा, राजेश विठ्ठल अंबारे (वय ३५) व जितू खोब्रागडे (वय ३५) दोघेही रा. डोंगरमेंढा हे ट्रॅक्टरमध्ये होते.
अपघाताच्या वेळीच हरिराम बिसेन (वय ४०) व इशुलाल पटेल (वय ४५) दोघे रा. करंगी ता. गोंदिया हे एमएच ३७ एम २४०७ या क्रमांकाच्या दुचाकीने देसाईगंज येथून बांधकाम मजूर अरततोंडी गावाकडे जात असताना, त्यांची दुचाकी अपघातग्रस्त झाली.

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बावनकर यांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या भीषण अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने