सभापती सुनीलभाऊ उरकुडे यांच्या हस्ते मानोली येथील लसीकरण उपकेंद्राचे उद्घाटन.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- आज मानोली उपकेंद्र येथे लसीकरणाचे उद्घाटन सभापती सुनील उरकुडे यांच्या हस्ते करण्यात आली. गावातील सर्वच नागरिकांनी कुठलीही भीती न बाळगता कोविड लसीकरण करून घेण्याचे आवाहन सभापती सुनील उरकुडे यांनी याप्रसंगी केले व नागरिकांना कमी अंतरावर लसीकरण घेता येण्यासाठी या नवीन उपकेंद्रा वर लसीकरणाची सोय उपलब्ध केल्याचे त्यांनी सांगितले. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षित आरोग्यासाठी आरोग्य प्रशासनाने दिलेल्या सूचनेचे पालन करण्याची विनंती त्यांनी केली.

 लसीकरण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी  उपसरपंच वामन तुरानकर  नोकारी खु., लचुं मेश्राम सरपंच मानोली, देवरावजी आदे  उपसरपंच मानोली, आर राठोड  ग्रामसेवक मानोली, नोकारी खु. चटप पोलीस पाटील, प्रियंका ब्राह्मणे मॅडम वैद्यकीय अधिकारी मानोली, सुचिता जिचकर ए. एन. एम, बुध्दकुमारी दुर्गे संगणक चालक किसन सातपुते उपस्थित होते.