जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏

✌️

कारची दुचाकीला धडक; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू.आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- गडचांदूर रस्त्यावरील खामोना गावाजवळ एका कारने दुचाकीला धडक दिल्याने एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. ही घटना बुधवारी घडली.
वासुदेव जुनघरे (४५) रा. पाचगाव असे मृताचे नाव आहे. पाचगाव येथील शेतकरी वासुदेव जुनघरे हे शेतीसाठी बियाणे घेण्यासाठी आपला भाचा अजय चौधरी याच्यासोबत दुचाकीने राजुरा येथे आले होते. येथून गावाकडे जाताना खामोना गावाजवळील जिनिंगजवळ एका कारने (क्रमांक एमएच ३४ बीआर ४७१५ ) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात वासुदेव जुनघरे यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत जखमी झालेल्या अजय चौधरी ( २० ) याला चंद्रपूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेतील कार नवनाथ चन्ने यांची आहे. राजुरा पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत