Top News

आम्ही आत्महत्या करायची का? कोरोना योद्ध्यांनी राज्यपालांना पाठवले रक्ताने पत्र.



(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- कोरोना काळात आपल्या जीवाची बाजी लावत काम करणाऱ्या कोविड योद्ध्यांना गेल्या सात महिन्यांपासून पगार नाही. यासाठी चंद्रपूर शहरामध्ये गेल्या ११५ दिवसांपासून ५०० कंत्राटी कामगारांचे डेरा आंदोलन सुरू आहे. मात्र कोणीच दखल न घेतल्यामुळे एका आंदोलनकर्त्या करोना योद्ध्यांने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून आपल्या व्यथा मांडल्या आहेत.
चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० च्या जवळपास कंत्राटी कामगारांचे वेतन मिळण्यासाठी डेरा आंदोलन सुरू आहे. या कामगारांना गेल्या ११ महिन्यापासून वेतन मिळाले नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयात निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मागील १२ महिन्यापासून नवीन कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली नाही. कत्राटदार नसतांना कंत्राटी कामगारांकडून करोना आपत्तीमध्ये कामे करवून घेण्यात आली. मात्र कंत्राटदार नसल्यामुळे कामगारांचे पगार कोणाच्या मार्फत द्यायचे हा प्रश्‍न निर्माण झाला. त्यामुळे कामगारांचे 7 महिन्यांचे पगार थकीत आहेत.
कामागारांनी आपल्या व्यथा मांडताना, '११ महिन्यापांसून पगार नाही, जगायचे कसे? आम्ही आत्महत्या करायची का? आमच्या जीवाचे कमी जास्त झाल्यास वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सचिव सौरभ विजय, संचालक डॉ. लहाने व अधिष्ठीता वैद्यकीय महाविद्यालय यांचे विरुद्ध सदोष मनुष्यवधाचे तसेच ॲट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करवे ही विनंती' असे राज्यपाल यांना रक्तांने लिहून पत्र पाठविण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने