राष्ट्रसंताच्या विचारांचा आदर्श ठेवुन तरूण उतरले ग्राम स्वच्छतेला.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
कोरपणा:- येथुन जवळच असलेल्या मौजा लोणी येथे राष्ट्रधर्म युवा मंच तथा गुरूदेव सेवा मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गावचे पोलिस पाटिल एकनाथ वडस्कर यांचे नेतृत्वात गावातिल तरूणांची बैठक घेऊन स्वच्छतेचा मुलमंत्र देण्यात आला. तेव्हा गावातिल बहुतांश युवकांनी या कार्याला प्रथम प्राधाण्य दिले.
सोबतच ग्राम युवा मंडळ समिती गावात स्थापण करण्यात आली. सोबतिला गुरूदेव सेवा मंडळाचे नंदकिशोर वडस्कर हे ही आले,आणी गावात रामधुन काढुन समाजात स्वच्छतेच्या मुल मंत्रासोबतच स्वत: गाव स्वच्छ करूण एक आदर्श निर्माण करण्याचे ठरले. याची प्रचिती आज गावात दिसुन आली,प्रभात काळी तरूण मंडळी एकत्र येऊन ग्राम स्वच्छतेत सहभागी झाले.
यावेळी सतिश मुसळे, काशिनाथ किन्नाके, संतोष नांदेकर, राष्ट्र धर्म युवा मंच तालुका प्रवक्ता तुकाराम कोकनारे महाराज, ओम थेरे, सारंग मुसळे, सोमेश्वर सिडाम, मनिष बोबडे, मयुर बोबडे, अविनाश सिडाम, राकेश चौधरी यांचे सह गावातिल तरूणांनी या कार्यात आपली सहभागिता नोंदवुन स्वच्छता मिशन मध्ये सहभाग घेतला.