Click Here...👇👇👇

वेळोवेळी खंडित करण्यात येणाऱ्या वीजपुरवठाला आळा घालावा- आसिफ सय्यद

Bhairav Diwase
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्याशी चर्चा करून निवेदनाद्वारे मागणी.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- आज दि.०३/०६/२०२१ ला ऊर्जा, नगरविकास, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री मा. प्राजक्तदादा तनपुरे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा होता. त्या अनुषंगाने राजुरा तालुक्यात व शहरात वेळोवेळी खंडित करण्यात येणारा वीजपुरवठा हा दररोज सुरळीत सुरू ठेवण्यात यावा या विषयावर सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले.


राजुरा तालुक्यात तथा राजुरा शहरात नेहमीच विजेचा लपंडाव सुरू राहत असून जरासा पाऊस अथवा किरकोळ वारा जरी आला तरी वीज पुरवठा हा खंडित केला जातो. व त्या नंतर पुन्हा लवकर सुरू सुद्धा करण्यात येत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
येणारे दिवस हे पावसाळ्याचे असल्याने हा प्रकार आणखी वाढणार आहे ही शक्यता नाकारता येत नाही. परंतु या मुळे सामान्य लोकांना शेतकरी वर्गाला व विशेषतः शहरातील व तालुक्यातील कोरोना रुग्णांना जास्त प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
करिता ह्या प्रकरणात गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. आसिफ सय्यद यांनी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा, नगरविकास, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री श्री. प्राजक्त तनपुरे साहेब यांच्या कडे केली असून मंत्री महोदयांनी त्याच क्षणी दूरध्वनी द्वारे राजुरा येथील संबंधित विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. लोहे साहेब यांच्याशी चर्चा करून ह्याच्या नंतर विनाकारण असा प्रकार घडू नये याबाबत सूचना केल्या.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री.संतोषभाऊ देरकर, युवक तालुका अध्यक्ष श्री. आसिफभाऊ सय्यद, रखीब शेख शहर अध्यक्ष महिला शहर अध्यक्ष सौ. अर्चनाताई ददगाळ, श्री. राजुभाऊ ददगाळ, युवक शहर अध्यक्ष श्री. स्वप्नील बाजुजवार, संदीप पोगला, अंकुश भोंगळे, सुजित कावळे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.