Top News

राजुरा विधानसभा क्षेत्रात जंम्बो कोविड-१९ रुग्णालय उभारावे- संतोषभाऊ देरकर

राज्यमंत्री मा. प्रजाक्तदादा तनपुरे यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- आज दि.०३/०६/२०२१ रोज
राज्यमंत्री मा. प्रजाक्तदादा तनपुरे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा होता. त्या अनुषंगाने राजुरा विधानसभा क्षेत्रात जम्बो कविड-१९ रुग्णालय उभारण्यात यावे या विषयावर सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले.
राजुरा विधानसभा क्षेत्रात मागील दीड वर्षात अनेक कोविड-१९ चे रुग्ण बघावयास मिळाले. परंतु राजुरा उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने रुग्णाला गरजेनुसार बेड उपलब्ध नसतात. त्याकारणाने रुग्णांस चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येते.
रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आपल्या राजुरा विधानसभा क्षेत्रात असलेले व्यवसाय, कंपनी म्हणजे जसे की WCL (गोवरी, सास्ती, बल्लारशाह, पोवणी) या खदानी असून, तसेच सिमेंट फॅक्टरी (अल्ट्राटेक, अंबुजा, दालमिया, माणिकगड) तसेच इतर असे मोठे मोठे प्रकल्प आपल्या विधानसभा क्षेत्रात आहे. त्या कंपन्यांच्या सहायाने राजुरा विधानसभा क्षेत्रात जंबो कोविड रुग्णालय उभारण्यात यावे. जेणेकरून रुग्णांची गैरसोय होणार नाही तसेच या कंपनी कडून आपल्या विधानसभा क्षेत्रात एक मोठी मदत जंबो कोवीड-१९ रुग्णालयाच्या स्वरूपात निर्माण होईल. व लवकरच कोवीड-१९ रुग्णालयाच्या कामाला सुरुवात व्हावी या साठी प्राजक्त तनपुरे साहेबांना निवेदन देण्यात आले.


त्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री.संतोषभाऊ देरकर, युवक तालुका अध्यक्ष श्री. आसिफभाऊ सय्यद, रखीब शेख शहर अध्यक्ष महिला शहर अध्यक्ष सौ. अर्चनाताई ददगाळ, श्री. राजुभाऊ ददगाळ,स्वप्नील बाजुजवार, सुजित कावळे,संदीप पोगला,अंकुश भोंगळे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने