Top News

रेतीतस्करांकडून या वर्षात ८० लाखाचा दंड वसूल.

भद्रावतीचे तहसिलदार महेश शितोळे यांची माहीती.

रेती तस्करीचा ट्रॅक्टर शहरातील भर चौकात पकडला.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- गेल्या वर्षभरात भद्रावती तहसील प्रशासनाकडून ७९ अवैध रेतीतस्करांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्या कडून आतापर्यंत ८० लक्ष रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती भद्रावतीचे तहसीलदार महेश शितोळे यांनी दिली आहे.
भद्रावती शहरात तथा तालुक्यात अवैध रेतीतस्करांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे तहसिल प्रशासन व्यस्त असल्यामुळे या रेतीतस्करांनी चांगलेच फावत आहे.
विशेषता ग्रामीन भागात महसूल अधिकारी तथा कर्मचारी वेळेत पोहचू शकत नसल्याने ग्रामीन भागात रेतीतस्कर तयार झालेले आहे. रात्रोच्या वेळेस तालुक्यातील मांगली,चंदनखेडा, कोंढा आदी भागात मोठ्या प्रमाणावर रेतीची तस्करी होत असून या तस्करी मुळे शासनाला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे.
 महसूल विभाग हा रेतीतस्करीवर लक्ष ठेऊन असून २०२१ मध्ये ७४ अवैध रेतीची तस्करी करणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत ७५ लाख रुपयांचा तर एप्रिल २०२१ मध्ये ९ रेतीतस्करांवर कारवाई करीत ५ लाख रुपयांचा असा एकूण ८० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दि.१ मे रोजी सायंकाळी शहरातील बाजारपेठेत जामा मश्जिद चौकात अवैध रेतीची वाहतूक करीत असलेला एक ट्रॅक्टर पकडण्यात आला असून सदर ट्रॅक्टर वसंता उमरे किल्ला वार्ड भद्रावती यांच्या मालकीचा असल्याची माहिती महसूल विभागाने दिली.ट्रॅक्टर महसूल विभागाने आपल्या ताब्यात घेवून तहसील कार्यालयात जमा केले. याबाबतची पुढील कारवाई महसूल विभाग करीत असल्याची माहिती तहसीलदार महेश शितोळे यांनी पत्रकारांना दिली.
त्याच प्रमाणे अवैध रेतीतस्करी करणाऱ्या अनेक ट्रॅक्टरचे नंबर अस्पष्ट असतात व दिसत नाही. त्याचा त्रास नागरीकांनाही होत असल्यामुळे परिवहन विभागाने शहरातील अशा ट्रॅक्टरवर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने