जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

शेणगाव येथे कोविड-१९ या जागतिक महामारीतून बाहेर पडण्याकरीता लसीकरण जनजागृती मोहिम तथा तंबाखूमुक्त शाळा ,गाव, जनजागृती कार्यक्रम संपन्न.(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेणगाव येथे पंचायत समिती जिवती  गटविकास अधिकारी पेंदाम साहेब व श्री सचिनकुमार मालवी शिक्षण विस्तार अधिकारी ,श्री महेश मेश्राम सरपंच,श्री प्रेमदास राठोड अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती शेणगाव, श्री दिपक नगराळे सदस्य ग्राम पंचायत/शा.व्य. समिती, संग्राम केंद्रे विषय शिक्षक, बाबा कोडापे विषय शिक्षक, आदिंनी कोव्हक्शीन /कोविशिल्ड लसीकरण जनजागृती मोहिम तथा तंबाखुमुक्त गाव, शाळा जनजागृतीच्या अनुषंगाने जनतेला आव्हान केले.                    
गावातील लोकांनी १००% लसीकरनासाठी सहभाग घेवून एक आदर्श घालवून द्यावा. कोविड-१९  या महामारीतून बाहेर येण्यासाठी तसेच तिसरी लाट थोपवण्यासाठी १००% लसीकरण करने. मास्क लावणे, सॅनिटाइजरचा वापर करणे, साबनाने हात धुने, विशिष्ट अंतर राखने इत्यादी बाबी करण्याचे आव्हान गटविकास अधिकारी पेंदाम साहेब यांनी केले.तसेच गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,शाळेतील शिक्षक, अंगणवाडी शिक्षिका, आरोग्य सेवक यांनी या मोहिमेचा हिस्सा बनून जनजागृतीची मशाल बनण्यासाठी सचिनकुमार मालवी विस्तार अधिकारी यांनी सुचीत केले. 
गावातील सरपंच ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, ग्राम पंचायत समितीचे सदस्य, व शिक्षकांनी जनजागृती करण्याचा विश्वास गटविकास अधिकारी यांना दिला. सलाम मुंबई फाऊंडेशन अंतर्गत प्राप्त झालेली टिशर्ट, मास्क, बैच, प्रमाणपत्र व विशेष पारितोषिक रक्कम रूतुजा वारे, प्रतिक्षा शिंदे, वैष्णवी माळगे, वैशाली राठोड, माहेश्वरी वारे व बाबा कोडापे यांना देवून त्यांच्या कार्याचा गौरव गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सरपंच, अध्यक्ष व सदस्यांनी केला.
रुतुजा वारे हिने आपले मनोगत व्यक्त केले. Commit to quit Tobacco बाबत शपथ घेतली व तंबाखूजन्य पदार्थांच्या नादी गेलेल्यांना मुक्त करण्याचे व्रत घेतले असे सांगितले. तंबाखू, किंवा तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्याने काय शारिरीक मानसिक परिणाम होतात तसेच १००% तंबाखूमुक्त शाळा गाव ,जिल्हा व राज्य अर्थात देश करण्यासाठी या मोहिमेत आम्ही शेवटपर्यंत कार्य करु असे बाबा कोडापे यांनी मत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य व उपस्थीत पाहुण्यांचे आभार संग्राम केंद्रे विषय शिक्षक यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत