🙏🙏


🟥
🟥✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

हरवलेल्या बालकाला पाचोरा पोलिसांनी केले पालकांच्या स्वाधीन.


जळगाव:- दि. ५ जुन २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजेच्या सुमारास पाचोरा शहरात बाहेरपुरा भागात एक चार वर्षाचा बालक बेवारस मिळुन आला होता. याबाबत शहरातील मतिन रज्जाक बागवान यांनी पाचोरा पोलिस स्टेशनला माहीती कळविली. पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी परीस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे, पोलिस उपनिरीक्षक दत्तातय नलावडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, पोलिस कॉन्स्टेबल किरण पाटील, पोलीस नाईक राहुल बेहरे, किशोर पाटील, महिला पोलिस शारदा भावसार अशा पथकास बालकाचे पालकांचा शोध घेण्यासाठी तात्काळ रवाना केले.
वरील पथकाने मिळुन आलेल्या बालकास ताब्यात घेवुन पाचोरा शहरात त्याचे पालकांचा शोध घेतला. पोलिस पथकाच्या शोध मोहीमे दरम्यान हरवलेला बालक हा शेख रईस शेख बशीर रा. पाचोरा ता. पाचोरा जि. जळगाव यांचा मुलगा असल्याचे उघड झाले.
सदर मिळुन आलेल्या मुलाचे नाव हस्नान शेख रईस (वय ४) असे आहे पाचोरा पोलीसानी वरील मुलाचे पालकास पाचोरा पोलीस स्टेशन येथे बोलावुन हस्नान शेख रईस यास त्यांचे ताब्यात सुखरुप सोपविले आहे.