जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या उपस्थितीत चुनाळा येथे आढावा बैठकीचे आयोजन.(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- ग्रा.पं.चुनाळा (पं.स.राजुरा) च्या वतीने आरोग्य वर्धिनी प्रा.आ.उपकेंद्र चुनाळा अंतर्गत कोविड-19, या कोरोना आजाराचे लसीकरण 100% करण्याकरिता ग्रा.पं. सदस्य, जि.प.शाळेचे शिक्षक, अंगणवाडी वर्कर, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी, महिला बचत गट प्रमुख, तंटामुक्त समिती सदस्य, शा.व्य.स.सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत मंगळवार दि.8.6.2021 रोजी सांस्कृतिक भवन ग्रा.पं.चुनाळा येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. 


बैठकीला माजी आमदार सुदर्शन निमकर, गट विकास अधिकारी ओमप्रकाश रामावत, प.स.सदस्य तुकाराम माणुसमारे, सरपंच बाळू वडस्कर, बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली सलाटे, माजी सरपंच संजय पावडे, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे श्री इंगळे, श्री टेकाम, ग्रा.पं.चे सर्व सदस्य, पोलीस पाटील रमेश निमकर,  तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर निमकर, ग्रा.वि.अ.व मान्यवर उपस्थित होते. 


सरपंच बाळू वडस्कर यांनी प्रास्ताविकात 45 वर्षा वरील नागरिकांचे आज पर्यंत 50% लसीकरण झाल्याचे सांगून 100% लसीकरण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी गट विकास अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत व माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.उपस्थित मान्यवरांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमातील सर्व उपस्थितांना फेस मास्क चे वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ग्रा.पं.चे सदस्य व ग्रा.पं.चे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत