जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

श्री साई महाऑनलाईन सेतू केंद्राची मान्यता रद्द करा.

जिल्हा भाजयुमोची मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
भद्रावती:- भद्रावती तहसील कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या येथील श्रीराम नगरमधील श्री साई महाऑनलाईन सेतू केंद्राची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी भाजयुमोचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिका-यांकडे केली आहे.
येथील तहसीलदार महेश शितोळे यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात इम्रान खान यांनी म्हटले आहे की, दि.२८ मे रोजी नागपूर-चंद्रपूर महामार्गावर श्रीरामनगर येथे असलेल्या श्री साई महाऑनलाईन सेतू केंद्रावर भद्रावती-नागपूर प्रवासासाठी ई-पास काढण्यासाठी गेलो असता प्रत्येकी ४०० रुपये असे चार जणांचे १६०० रुपयांची मागणी करण्यात आली. मी त्या सेतू केंद्राच्या संचालकाला इतके पैसे कशाला लागतात असे विचारले असता शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे ते तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे प्रति व्यक्ती तुम्हाला ४०० रुपये द्यावेच लागतील असे उत्तर दिले.
सध्या कोरोना काळ सुरु असून लाॅकडाऊनमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. माझ्यासारख्या एका राजकीय पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांकडून असे पैसे मागितले जात असतील तर सामान्य जनतेकडून किती पैसे घेतले जात असतील? असा प्रश्नही इम्रान खान यांनी निवेदनातून उपस्थित केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत