Top News

नारंडा ग्रामपंचायत येथे कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन.

गावातील नागरिकांनी घेतला लसीकरण शिबिराचा लाभ.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
कोरपना:- कोरपना तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडा व दालमिया भारत फॉउंडेशन तर्फे ग्रामपंचायत नारंडा येथे कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील टेंभे,नारंडा ग्रामपंचायतच्या सरपंच अनुताई ताजने,उपसरपंच बाळा पावडे,युवा नेते आशिष ताजने, डॉ.दिक्षा ताकसांडे,ग्रामपंचायत सदस्य रुपाली उरकुडे उपस्थित होते.
कोरोना लसीकरणाचा लाभ हा समाजातील अंतिम घटकांपर्यंत पोहचला पाहिजे,व कोरोना लसीकरणाबाबत समाजात जे गैरसमज आहेत ते दूर होऊन कोरोना लसीकरणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढविण्यासाठी व कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
   नागरिकांनी न घाबरता लसीकरण घेतले पाहिजे लसीकरण घेतल्याने कोणतेही विपरीत परिणाम आपल्यावर होत नाही,तसेच आपल्याला एक आदर्श नागरिक म्हणून जीवन जगत असताना आपले सामाजिक दायित्व जपत प्रत्येक नागरिकांनी कोरोना लसीकरणसंदर्भात जनजागृती केली पाहिजे,जेव्हा संपूर्ण नागरिकांचे लसीकरण होणार तेव्हाच आपण कोरोनाला आपल्यातून हद्दपार करू असे प्रतिपादन आशिष ताजने यांनी केले.
      यावेळी डॉ.स्वप्नील टेंभे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले,नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आत्तापर्यत तब्बल ६ हजार नागरिकांचे लसीकरण झाले असल्याची माहिती दिली,व त्यांनी कोरोना काळात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल ग्रामपंचायत नारंडा तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
        यावेळी गावातील  सरपंच अनुताई ताजने व  विविध नागरिकांनी कोरोना लसीकरण शिबिराचा लाभ घेतला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सत्यवान चामाटे,प्रवीण हेपट, अजय तिखट दालमिया फॉउंडेशनचे लक्ष्मण कुडमेथे,गौरव वांढरे व नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे  आरोग्य सेविका पंचशीला मेश्राम,आरोग्य सहायक सुरेश कीनाके,मोरोतकर,प्रवीण खांडरे,सौरभ बोबडे यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने