Top News

तंटामुक्त समितीने लावून दिला प्रेमीगुलांचा विवाह.


(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चंद्रपूर:- प्रेमात जीवनभर साथ देण्याच्या आणाभाका घेतलेल्या प्रेमीयुगूलास घरच्यांचा विरोध पत्करून विवाह करायचा होता. यामुळे रितसर तंटामुक्त समितीकडे अर्ज केल्यानंतर सोमनपल्ली येथील तंटा मुक्त समिती पदाधिकाऱ्यांनी प्रेमीयुगूलाचे स्वप्न साकार केले आहे.
चामोर्शी तालुक्यातील धर्मपुर येथील पवन तुकाराम पोरेते (वय 25) आणि कुरखेडा तालुक्यातील वारवी येथील अर्चना सुखदेव उईके (वय 23) यांचे एकमेकांवर प्रेम जडले होते. दोघांनीही लग्न करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला मुलाच्या पालकांनी संमती दिली. परंतु मुलीच्या पालकांनी विरोध दर्शविला.
यामुळे या दोघांनीही सोमनपल्ली येथील तंटामुक्त समितीकडे विवाह करून देण्यासाठी अर्ज केला. तंटामुक्त समितीने सर्व शहनिशा करून काल ९ जून रोजी त्यांचा विवाह लावून दिला व वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी तंमुसचे अध्यक्ष निलकंठ दुधकोहर, सरपंच निलकंठ निखाडे, ग्रामपंचायत सदस्या शालु दुधकोहर, मंगला सिडाम, सचिव बांबोळे, रामदास वेलादी, रमेश कुळमेथे, संजय पोरेते, रामदास सिडाम व गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने